Friday, July 13, 2018

पावसाळयातील आकर्षण विसापूर किल्ला (Visapur fort)

विसापूर

विसापूर ऊर्फ संबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा (बोर) घाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.

इतिहास

मराठे इ.स. १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च इ.स. १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

भौगोलिक स्थान

लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्याधरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे. तुंग उर्फ कठीणगडही येथेच आहे. अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

पायऱ्यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत.गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी लक्ष वेधून घेते. गडावर एक मोठे जातेही आहे

गडावर जाण्याच्या वाटा

मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या छोट्या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूरकिल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.

१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण पुन्हा एकदा मोडकळीस आलेल्या पायर्‍यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.२) दुसर्‍या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.

विसापुर किल्ल्याची गुगल पिन

https://goo.gl/maps/62M3BeWtd4S2

मळवली ते विसापुर वाहनाने जायच्या मार्ग दाखवणारा गुगल मॅप

https://goo.gl/maps/VkNrHGKtv2D2

मळवली ते विसापुर चालत जायच्या मार्ग दाखवणारा गुगल मॅप

https://goo.gl/maps/2eUA8GnrHZy

विसापुर किल्ल्याबाबत संपुर्ण माहिती देणारा यु ट्युब व्हिडिओ

https://youtu.be/zgmAI7WsKCE

संदर्भ .:- विकिपिडिया , गुगल मॅप व यु ट्युब .

**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)


Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

No comments:

Post a Comment