नाणेघाट ट्रेक
पावसाळ्यात जरा साहसी पर्यटणाचा आनंद लुटायचा असेल तर जुन्नर जवळील नाणेघाट चा ट्रेक एक सुंदर पर्याय आहे .
नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला. प्रतिष्ठान (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. सातवाहन काळात कल्याण ते पैठण या राजमार्गावर जुन्नर जवळ डोंगर फोडून नाणेघाटाची निर्मिती केली गेली . कल्याण बंदरामध्ये उतरणारा माल व्यापारी घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या पैठण नगरीत व्यापारासाठी नेला जाई. नाणेघाटाचा वापर केल्याबद्द्ल या व्यापार्र्यांकडून जकात जमा केली जात असे. त्या जकातीचा दगडी रांजण आजही नाणेघाटात पाहावयास मिळतो.
साठ मीटर लांब आणि जागोजागी दोन ते पाच मीटर रूंद अशी ही नाणेघाटाची वाट आहे. या वाटेच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे. अदमासे चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असे. जकात कर रुपाने यात तत्कालीन ‘कर्षापण’ नावाची नाणी टाकली जात असत . शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन हे चार किल्ले नाणेघाटाच्या संरक्षणासाठी वापरले जात . नाणेघाट चढून गेल्यावर प्रथम दिसते ती कातळात कोरलेली लांब रूंद आणि सुंदर गुहा या गुहेत साधारणत: ४० - ४५ जण राहू शकतात . गुहेत सातवाहनकालिन शिल्पे कोरलेली आहेत. यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालिवाहनाचे, दुसरे शिल्प राजा सातकर्णी याची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे आहे.
गुहेवर पाण्याची टाकी आढळतात. गुहेच्या वर एक प्रचंड कातळ भिंत दिसते, याला नानाचा अंगठा असे म्हणतात. घाटमाथ्यावर पोहचल्यावर ,उजवीकडे वळल्यावर आपण नानाच्या अंगठ्यावर येऊन पोहोचतो. येथेच बाजूला एक गणेशाची मूर्तीही दृष्टिक्षेपात येते. समोर दिसणारे गोरखगड, मच्छिंद्रगड , सिध्दगड, हरिश्चंद्रगड, भैरवकडा, कोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन स्वच्छ वातावरण असेल तर पहाता येतात . घाटावरील विस्तीर्ण असे पठार हे नाणेघाटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. हा ट्रेक करण्याना रहाण्याची सोय येथिल गुहेत आहे . नाणेघाटात कोणत्याही प्रकारच्या जेवणाची सोय नसल्याने ही सोय आपण स्वत:च करावी लागते . पिण्यायोग्य पाणी गुहेशेजारील तीसर्या व चौथ्या टाक्यातील आहे. येथिल गुहे पर्यत जाण्यास पायथ्यापासून दोन तास लागतात.
कसे जाल :-
पुण्याहून नाणेघाटाला जायचे झाल्यास पुणे - जुन्नर एसटी पकडून जुन्नरला यावे. जुन्नर ते घाटघर एसटी पकडून घाटघरला यावे. येथ पर्यंत पोहचण्यास दीड तास लागतो. घाटघर वरून ५ किमी चालत नाणेघाट गाठता येतो.
जवळचे विमानतळ / रेल्वेस्टेशन पुणे
नाणेघाट बाबत सुंदर युट्युब क्लिप
https://youtu.be/lzf99Oz7KR0
नाणेघाटाचा ट्रेक जेथून सूरु करतात त्या ट्रेकिंग पॉइंटची गुगल पिन
https://goo.gl/maps/cL6H6H3jJMM2
नाणेघाट खिंडिची गुगल पीन
https://goo.gl/maps/chq56uvBvro
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975

No comments:
Post a Comment