पावसाळ्यातील पुष्प महोत्सव कास पठार
कास पुष्पपठार सातारा
क्षेत्रफळ१० चौ. किमी (३.९ चौ. मैल)
नियामक मंडळ :- सातारा वनविभाग
जागतिक वारसा स्थळ घोषणा वर्ष : - २०१२
कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणः २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलावसातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे.
कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.
इतर पर्यटनस्थळे
कास तलाव
कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. ते सज्जनगडकिल्ला आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे. कास तलावाच्या दक्षिणेला ३० किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे. तलावाच्या जवळच वजराई धबधबा आहे. हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे.
ठोसेघर धबधबा
सज्जनगडापासून १३ किमी अंतरावर ठोसेघरचा धबधबा आहे.सह्याद्रीच्या डोंगर रांगाप्रमाणे ठोसेघरला देखील धबधब्यांच्या रांगा आहेत. त्यातील एका धबधब्याची उंची साधारणपणे २०० मीटर आहे. पावसाळ्यात पर्यटकांची इथे खूप गर्दी असते.कस्पठार हे अत्यंत सुंदर फुले पाहायला मिळतात.इथे फुलांच्या संवर्धनासाठी कडक नियम आहेत.त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते.निसर्गाचा सुंदर देखावा इथे पहावयाला मिळतो.
जगात इतरत्र कुठेहि न आढळणाऱ्या कास मधिल काहि वनस्पती व प्राणी म्हणजे येथे अपोनोगेतोन साताराइन्सीस ( वनस्पती ), आयडीओपिस कासइनसीस( कोळी),निम्यास्पीस गिरी ( पाल) या प्रदेशनिष्ठ प्राण्यांची नोंद झाली आहे.
कास पठारावर आढळणाऱ्या इतर वनस्पती: -
कास पठारावर आढळणाऱ्या फुलांपैकी काही फुलांची शास्त्रिय तसेच स्थानिक नावांची यादी -
Adenoon indicum (मोठी सोनकी)Aerids maculosumAponogeton satarensis (वायतुरा)Arisaema murrayi (पांढरा सापकांदा)Begonia crenataCeropegia jainii (सोमाडा)Ceropegia vincaefolia (कंदील पुष्प/कंदील खर्चुडी)Ceropegia mediaChlorophytum glaucoides (मुसळी)Cyanotis tuberosa (आभाळी)Dendrobium barbatulum (भारंगी)Dioscorea bulbifera (डुक्कर कंद)Dipcadi montanum (दीपकडी)Drosera burmanni (दवबिंदू)Drosera indica (गवती दवबिंदू)Elaeocarpus glandulosus (कासा)Exacum tetragonumFlemingia nilgheriensisHabenaria grandifloriformisHabenaria heyneana (टूथब्रश ऑर्किड)Habenaria longicorniculataHabenaria panchganiensisHitchenia caulina (छावर)Impatiens oppositifoliaIpomoea barlerioidesLinum mysurense (उंद्री)Memecylon umbellatum (अंजनी)Murdannia lanuginosa (अबोलिमा)Murdannia simplex (नीलिमा)Nymphoides indicum (कुमुदिनी)Oberonia recurvaParacaryopsis coelestina (निसुर्डी)Paracaryopsis malbarica (काळी निसुर्डी)Pinda concanensis (पिंड)Pogostemon deccanensisRotala fimbriataRotala ritchiei (पानेर)Senecio bombyensis (छोटी सोनकी)Senecio grahami/bombayensis (सोनकी)Smithia agharkariiSmithia hirsute / hirsuta (कवळा)Trichosanthes tricuspidata (कोंडल)Utricularia purpurascens (सीतेची आसवे)Vigna vexillata (हालुंडा)Wild Brinjal flower (काटे रिंगणी)
कसे जाल :
जवळचे ठिकाण :- सातारा येथुन साधारण २२ कि . मी . जवळचे रेल्वे स्टेशन सातारा . जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमान तळ .
कास पठार गुगल पिन
https://goo.gl/maps/bobZmXnwyuN2
भेट द्यायला योग्य महिने
ऑगस्ट ते ऑक्टोबर
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975

No comments:
Post a Comment