दूधसागर धबधबा व ट्रेक
दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडवी नदीवरील धबधबा आहे. हा धबधबा पणजीपासून ६० किमी अंतरावर आहे. हा धबधबा मडगाव-बेळगाव लोहमार्गावर असून मडगावच्या पूर्वेला ४६ किमी आणि बेळगावच्या दक्षिणेला ८० किमी अंतरावर आहे. दूधसागर धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून त्याची उंची ३१० मी (१०१७ फूट) आणि सरासरी रुंदी ३० मी आहे.
हा धबधबा पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. हा भाग जैवविविधतेने संपन्न असलेल्या घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. उन्हाळ्यामध्ये हा धबधबा अतिशय नेत्रदीपक नसला, तरी पावसाळ्यामध्ये विशेषतः ऑगस्ट मध्ये याचे दृष्य विलोभनीय असते.
धबधब्यापर्यंत पोहोचण्याचे
धबधब्यापसून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कॅसलरॉक रेल्वे स्थानक आहे. या स्थानकापर्यंत रस्त्यानेसुद्धा पोहोचता येते. तिथून रेल्वेने दूधसागर धबधब्यापर्यंत जाता येते. दूधसागर रेल्वे थांब्याला फलाट नाही. प्रवासी आणि पर्यटकांना रेल्वेच्या या अनियोजित १ ते २ मिनिटांच्या थांब्यामध्ये रेल्वेतून उतरून रुळावरून धबधब्यापर्यंत १-२ किमी चालत जावे लागते. अलिकडे भारतीय रेल्वेने प्रवाश्यांना दूधसागर थांब्याला उतरण्यास मनाई केली आहे
धबधब्याच्या आसपास स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची कुठेही सोय नाही. तसेच तिथे मोबाईल सिग्नलही मिळत नाही आणि रस्त्यानेही तिथपर्यंत पोहोचता येत नाही. धबधब्याला भेट देताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. दूधसागर धबधबा ट्रेकिंगचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक ट्रेकिंग संस्था पावसाळ्यात दूधसागर धबधब्याचे ट्रेक आयोजित करतात ज्यामध्ये कॅसलरॉक स्टेशनपासून धबधब्यापर्यंतचे अंदाजे २१ किमीचे ट्रेक आणि धबधब्याच्या पायथ्याशी एक दिवसाचा मुक्काम यांचा समावेश आहे. पावसाळ्यात दुधसागर धबधबा बघण्यासारखा असतो. बर्याच फिल्म्समध्ये हा धबधबा दाखवलेला आहे.
दुधसागर ट्रेक
सामान्य जनतेसाठी दुधसागर ट्रेक बंद करण्यात आली आहे. दुधसागर रेल्वे ट्रेक सामान्य जनतेसाठी अधिकृतपणे बंद करण्यात आली परंतु दुधसागर धरणाचा ट्रेक अद्यापही सर्वांसाठी खुला आहे.
तेथे पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक कुलीम मार्गे ट्रेक करता येतो . आणि दुसरा पर्याय रेल्वे ट्रॅकमार्गे आहे. तुम्ही सोनालीम स्थानकांकडे येता आणि मड मार्गाने परत जाऊ शकता.
💣💣महत्त्वाची सुचना:
हा ट्रेक करताना सोबत या ट्रेकचा अनुभव असलेली व्यक्ती सोबत घ्या .
कसे जाल:
गोव्याची राजधानी पणजी हे येथून सर्वात जवळचे शहर . हे शहर रस्ते , रेल्वे व विमान मार्गाने भारतातील प्रमुख शहरांना जोडले आहे .
दुधसागर धबधब्याची गुगल पिन
https://goo.gl/maps/yRmV6rVcaq32
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975

No comments:
Post a Comment