Tuesday, July 3, 2018

पुण्यामुंबई पासून जरा थोडया अंतरावरचा बॉलिवूड फेम रंधा फॉल्स व अंब्रेला फॉल्स ( Randha and Umbrella waterfall )


लोणावळा / खंडाळा , महाबळेश्वर ठोसेघर अथवा माळशेज ला पावसाळ्यात तर तुम्ही नेहमी जाता परंतु पुण्या मुंबई पासून जरा थोडया अंतरावर भंडारदऱ्या जवळच्या रंधा फॉल्स , अंब्रेला फॉल्स अन विल्सन डॅम ला भेट हा एक लक्षात रहाण्यासारखा अनुभव घेता येईल .

रंधा फॉल्स
रंधा धबधबा महाराष्ट्रातील भंडारदरा शहरापासून फक्त 10 किमी अंतरावर आहे. हा  महाराष्ट्रातील सर्वोत्तम धबधब्यांमध्ये गणला जातो . रंधा धबधबाचे पाणी 170 फूट उंचावरून पडत आहे. घोरपडा देवीचे मंदिराजवळून रंधा धबधबा पहाता येतो . हा धबधबा प्रवरा नदिच्या प्रवाहात तयार झाला आहे .

बॉलीवूड मधील अनेक चित्रपट दिग्दर्शकही रंधा धबधब्याच्या प्रेमात पडले. त्यामुळे ‘मैने प्यार किया’, ‘प्रेम’, ‘कुर्बान’, ‘राजू चाचा’ इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांतील थरारक दृश्ये येथे चित्रित झालेली आहेत.

रतनगडचा किल्ला

१७६३ साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली किल्लेदार गोविंदराव खाडे ह्याला हरवून आदिवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला. येथुनच जवळ सांधन व्हॅली ला जाता येते .

पुराणात असा ऊललेख आहे समुद्र मंथन झाल्या वर देव आणि दानव यांच्या मध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन कले त्याच पंक्ती मधे राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहेस असे समजताच विषणुने मोहीनी रुप धारण करून त्या दानवाचा शिरछेद केला त्याचे धड राहूरी या ठीकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली त्या काळा पासून त्या धारेचे नदी मध्ये रुपांतर झाले व नदीस अमृत वाहीनी असे नाव पडले.
मुंबईहून इगतपुरी - घोटी मार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनवाडीला पोहचता येते.

रतनवाडीला पोहचण्यासाठी अकोले-रतनवाडी बस सुविधा आहे. परंतु ती सोयीची नाही.

विल्सन धरण (11 किमी दूर)

१९१० मध्ये प्रवरा नदीवर बांधलेला विल्सन धरण हा भारतातील सर्वात मोठा मातीचा धरण आहे जो त्या काळातील उत्कृष्ट
 अभियांत्रिकी तेचा उल्लेख केला जातो. धरणाच्या पायथ्यामध्ये एक सुंदर बाग आहे . याच नावाचे दुसरे धरण अमेरीकेतील अलाबामा राज्यात आहे .

पावसाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा धरणाची दारे मैदानी भागामध्ये पाणी सोडण्यासाठी आपोआप उघडले जाते .  धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बागेत जावून आपण धरणातून पडणाऱ्या पाणी अंगावर शिंपडण्याचा आनंद घेण्यासाठी गार्डनच्या काठा पर्यत जाऊ शकतो . येथे आणखी एक लोकप्रिय ठिकाण आहे अम्र्बेला धबधब म्हणून ओळखले जाते.

अंब्रेला फॉल्स
 हा विल्सन धरणाखाली बनलेल्या फॉल्स आहेत धरणातून निघणारे पाणी नैसर्गिकरित्या खडकांवर येते व ते चार हि दिशेस पसरून मस्त छत्रीचा आकार घेते. या धबधब्याच्या समोरील पुलावर ऊभे राहून धबधब्याचे लोभस रूप पाहता येते

आर्थर लेक:
स्वच्छ आणि शांत तलाव .सह्याद्रीच्या डोंगरांगांनी वेढलेला व  घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. या लेक ला प्रवरा नदीतून त्याचे पाणी मिळते. एक अरुंद रस्ताने सुमारे 50 किमी प्रवास करून  तलावच्या बॅक वॉटरला संपुर्ण फेरफटका मारता येतो . तलावाच्या सभोवताली असलेल्या टेकड्यां कॅम्पिंगसाठी  आणि हायकिंग साठी खुणावतात.

जाण्याचा योग्य वेळ

जुन ते सप्टेंबर पावसात भिजण्यासाठी , तसेच वर्षभर येथे जाता येते

कसे जाल

जवळचे शहर भंडारदरा . भंडारदराला जाण्यास पुणे मुंबई व नाशिक इथून रस्ते आहेत . जवळचे रेल्वे स्टेशन इगतपुरी . जवळचे विमानतळ मुंबई अथवा पुणे ..

गुगल पिन

रंधा फॉल्स

https://goo.gl/maps/VhJjwUH67V42

अंब्रेला  फॉल्स

https://goo.gl/maps/pzxV8msQcaT2

रतनगड

https://goo.gl/maps/xEgw3dzvg1n

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

No comments:

Post a Comment