खंडेरायांची सोन्याची जेजुरी
जेजुरी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे. येथे खंडोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे. मराठीमध्ये 'खंडोबाचा जेजुरी गड ' (खंडोबाची जेजुरी) म्हणून ओळखली जाते.
खंडोबाचे मंदिर एका लहान टेकडीवर वसलेले आहे, जेथे पोहोचण्यासाठी दोनशे
पायऱ्या चढायला लागतात . ज्यांना शक्य नाहि त्यांच्या साठी गडावर वाहनाने जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे . डोंगरावरून संपूर्ण जेजुरीचा एक सुंदर देखावा दिसतो. गड चढताना व मंदिराच्या अंगणात अनेक दीपमाळाचा आहे. जेजुरी हे प्राचीन काळापासुन या दिपमाळांसाठी प्रसिद्ध आहेत. खंडोबाच्या मणी आणि मल्ल या राक्षसां वरील विजय साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी मार्गर्शिष महिन्यात ६ दिवसांचे खंडोबाचे नवरात्र साजरा केला जातो. शेवटच्या दिवसाला 'चंपाशष्टी ' म्हणतात आणि या दिवशी अनेक गावांतुन मानाच्या काठ्या जेजुरीस देव भेटी साठी येतात . या दिवशी खंडोबास भाकरी , वांग्याचे भरीत , कांदयाची पात व मिर्चीचा खर्डा असा नैवेद्य दाखवला जातो .
जेजुरीचा इतिहास
मल्हारी महात्म्य आणि खंडोबा यांचा उल्लेख महाराष्ट्र व कर्नाटकच्या लोकसाहित्यिक येतो. पुराणामध्ये नमूद केलेले आहे की भगवान ब्रम्हदेवा कडून एक वरदान घेऊन दोन राक्षस माणि आणि मल्ल अत्यंत ऊन्मत्त झाले होते . . या वरदाना मुळेत्यांनी स्वतःला अजिंक्य मानु लागलेआणि पृथ्वीवरील संतांना व जनतेला त्रास देण्यास सुरुवात केली. नंतर भगवान शंकराने त्यांचा वध करण्यास खंडोबाचा अवतार घेतला . या अवतारात त्यांचे वाहन घोडा आहे , हातात त्रिशुळाच्या जागी तलवार आहे जीला खंडा असे संबोधले जाते . त्यांनी मणि व मल्ला चा वध केला . मृत्यु पावण्याच्या आधि मल्लासूर देवास शरण आला व त्याने देवास वरदान मागितले . त्या नुसार गडावर तटाच्या बाहेर मल्लासुरास देवाने जागा दिली . मल्लासुराचा वघ केल्याने खंडोबाचे दुसरे नाव मल्हारी पडले . तसेच देवाचे एक नाव मार्तंडभैरव हि आहे .
खंडोबा मंदिर वास्तुरचना
मंदिर प्रामुख्याने दोन भागात विभागले आहे. पहिला भाग सभामंडप आहे व त्याच्या पुढे दुसरा भागात पवित्र द्विलिंग स्वरूपात खंडोबा विराजमान आहेत. हेमोंडीच्या शैलीमध्ये बांधलेले मंदिर असून मंदिरापुढे 10x12 फूट पितळी कासव आहे. मंदिरात अनेक ऐतिहासिक शस्त्रे आहेत. त्यात देवाचा खंडा पण आहे . दसर्याच्या दिवशी खंडा उचलण्याची स्पर्धा खूप लोकप्रिय आहे. मंदिराच्या बाजुला अनेक देवळे आहेत . यात प्रामुख्याने तुळजाभवानी मंदिर व ध्रुतमारी चे मंदिर आहे . मंदिराच्या उजव्या बाजुस साक्षी विनायकाचे छोटे मंदिर आहे . मंदिराच्या परीसरा भोवती भक्कम तटबंदि आहे . मंदिरास जाण्यास पुर्वी नऊ लाख पायऱ्या होत्या असा एक उल्लेख पुराणात येतो . गडाच्या मध्यावर खंडोबा देवांची द्वितीय पत्नी बाणाई चे मंदिर आहे . बाणाई हि धनगर समाजातील असल्याने या मंदिराभोवती अनेक छोट्या छोटया मेंढरांच्या मुर्ति आहेत .
जेजुरी गावात अनेक मंदिरे असुन येथिल ग्राम देवी हि जानुबाई आहे . तिचे मंदिर गडाला जाण्याच्या वाटेच्या उजवी कडे चिंचेच्या बागेच्या कडे आहे . चिंचेच्या बागेत ३/४ प्राचिन समाध्या आहेत .
कडेपठार
जेजुरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार (कऱ्हेपठार) हे खंडोबाचं मूळ स्थान आहे, याची माहिती फारशी नसते. खंडोबा प्रथम येथे अवतिर्ण झाले . हे स्थान जयाद्री पर्वत अथवा जुना गड म्हणून पण ओळखले जाते . जेजुरी गावाच्या नैऋुत्य दिशेस साधारण साडेतीन किं .मीं . अंतरावर वसले आहे . जाण्यास पायऱ्यांची व्यवस्था आहे . जाताना वाटेत हेगडिप्रधान , भगवानगीरी मठ , गणेश मंदिर व राम मंदिर लागते . मंदिरास पुर्वी तटबंदि होती . जेजुरी गडावरून मागिल बाजुने एक वाट कडेपठाराला जाते .
उत्सव व पुजा विधि :-
जेजुरी येथिल मुख्य उत्सव हा चंपाषष्टी असून हा सहा दिवस चालतो . दसरा व वर्षातुन साधारणतः दोन वेळा येणाऱ्या सोमवती अमावस्येला जेजुरी यात्रेचे महत्व आहे . तसेच दर रविवारी व पोर्णिमेस पण येथे दर्शन घेण्याची प्रथा आहे .
खंडोबा हे महाराष्ट्र व कर्नाटक भागातिल अनेकांचे कुलदैवत आहे . लग्नानंतर नवदांपत्याला जेजुरीस खंडोबाच्या दर्शनास आणले जाते . खंडोबाच्या पुजेत सव्वा पावशेर सव्वा किलो असे सव्वाच्या पटित भंडारा (हळद) व खोबरे वापरले जाते . भंडारा खोबरे एकत्रित उधळण्याची प्रथा आहे . प्रचंड प्रमाणात भंडारा उधळला जात असल्यााने संंपुर्ण गड पिवळ्याजर्द रंगाने न्हाऊन निघतो त्यामुळे गड सोन्याचा असल्याचा भास होतो . गडावर तळी भरण्याचा विधि अवश्य केला जातो . महाराष्ट्रात लग्नानंतर जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आहे . अनेक जण जेजुरी येथेच जागरण गोंधळ हा विधि करतात . गोंधळात मुरळीचा (देवाची सेवेकरी) नाच हा कुळपरंपरेनुसार केला जातो . काहि लोकांच्यात मुरळी नाचवली जात नाहि . जागरण गोंधळ करण्यापुर्वी आपल्या घरातील जाणकार व्यक्ति बरोबर सल्लामसलत करा . जेजुरी येथे त्यासाठी चोख व्यवस्था येथिल स्थानिक मानकरी दरेकर , गोसावी व इतर कुटुंबांकडे होते . गोंधळाचा नैवेद्य शाकाहारी व मांसाहारी असा दोन्ही प्रकारे यजमानाच्या कुळपरंपरेनुसार केला जातो .
जेजुरीची संपुर्ण माहिती देणारी युट्युब क्लिप
https://youtu.be/hqKPv7ZPtHo
कडेपठारची वाट वर्णन करणारी युट्युब क्लिप
https://youtu.be/FTFhbxX-ZBQ
जेजुरीच्या जवळच अष्टविनायकांपैकि प्रथम मान असलेला मोरगावचा गणपती आहे . तसेच शंकराचे दुसरे रूप म्हस्कोबा चे स्थान येथून थोडयाच अंतरावर वीर येथे आहे . संतश्रेष्ठ सोपानदेव यांची समाधी पुणे जेजुरी मार्गावरील सासवड येथे आहे . व येथुन च जवळ प्रसिद्ध दत्तश्रेत्र नारायण पुर आहे .
कसे जाल:-
जेजुरी ला रस्ते मार्ग ने पुणे शहराबरोबर जोडले आहे . जेजुरी येथे रेल्वेस्थानक आहे . तसेच जवळचा विमानतळ पुणे (लोहगाव) येथे आहे .
जेजुरी गडाची गुगल पीन
https://goo.gl/maps/2ZYR2kBFaZm
कडेपठाराची गुगल पीन
https://goo.gl/maps/nYjxF2GTTCq
**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975

No comments:
Post a Comment