Thursday, July 12, 2018

ऐैतिहासिक पण दुर्लक्षित किल्ला तुंग (Tung fort)

तुंग किल्ला

तुंग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता.

इतिहास

पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गेचालणा-या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड ,विसापूर ,पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.

या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.

गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोडाच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेत थोडाच अंतरावर हनुमान मंदिर लागते. पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आत शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे.बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळ्या शिवाय इतर ऋतूत २ ते ३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. अशा प्रकारे एक दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते.

गडावरील राहायची सोय
तुंगवाडीतील मारुतीच्या मंदिरात ६ ते ७ जणांची राहण्याची सोय होते. तुंगवाडीत भैरोबाचे मंदिर आहे यात २ जणांना राहता येते.

गडावरील खाण्याची सोय

आपण स्वतः करावी.

गडावरील पाण्याची सोय

मंदिरा जवळच गावात पाणी उपलब्ध आहे. पावसाळ्यात गडावरील टाक्यात पाणी उपलब्ध असते.

कसे जाल

या गडावर जाणार्‍या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्यास साधारणत: ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो.

१) घुसळखांब फाट्यामार्गे :-

गडावर जाण्यासाठी लोणावळा स्टेशनवर पोहोचावे. येथून भांबूर्डे अथवा आंबवणे कडे जाणारी एसटी पकडून २६ किमी अंतरावरील घुसळखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ किमी अंतरावरील तुंगवाडीत पोहोचतो. येथून गडावर पोहचण्यास ४५ मिनिटे लागतात.

२) ब्राम्हणोली - केवरे

अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोना पेठेत उतरावे आणि काळे कॉलनी चा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लाँच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावा पासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.

३) तुंगवाडीच्या फाट्या मार्गे :-

जर लाँचची सोय उपलब्ध नसेल तर, तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एसटी महामंडाळाची कामशेत - मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीच्या फाट्यावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपणं तुंगवाडीत पोहोचतो.

तुंग किल्ल्याची गुगल पिन

https://goo.gl/maps/AcRNibvTr9r

लोणावळा त तुंग किल्ल्याला वाहनाने जाणारी वाट खालिल वेब अॅड्रेस मध्ये आहे .

https://goo.gl/maps/AdzNZastWZT2

तुंग ते तिकोना अशी वाहनाने जायची वाट खालिल वेब अॅड्रेस मध्ये आहे

https://goo.gl/maps/3433Y9rD3n12

तुंग किल्ल्याची संपुर्ण माहिती देणारा यु ट्युब व्हिडिओ

https://youtu.be/DJ319-KadA0

संदर्भ .:- विकिपिडिया , गुगल मॅप व यु ट्युब .
**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .  

शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)

Languages :- Marathi,  Hindi and little bit English.

( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent

९७६७५ ९१६७५

[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797

email address :-

travelbirdindia@yahoo.com


Can Contact between:-

9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate  it in your own language.
पर्यटण एक चळवळ


पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग


आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page

Travelbirdindia


आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter

https://mobile.twitter.com/Shailesh1881975

No comments:

Post a Comment