हंपी
हे ठिकाण हंपी अथवा हम्पी या नावाने ओळखले जाते .तुंगभद्रा नदीच्या काठी कोणे एकेकाळी वसलेले वैभवसंपन्न हंपी म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी. १५ व्या शतकात या राजधानीत आलेल्या पर्शियन राजदूताने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो आजपर्यंत कधी कल्पना केली नाही आणि डोळ्यांनी पाहिलीही नाही अशी ही नगरी. सगळ्या जगात तिला तोड नसावी. आजचे हंपी मात्र गतकाळच्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवित उभे आहे. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा या अवशेषांना दिला गेला आहे आणि त्यामुळे त्याचे जतनही उत्तम प्रकारे केले गेले आहे.
हरिहर आणि बुक्क या दोन महापराक्रमी भावांनी स्थापलेले विजयनगरचे साम्राज्य म्हणजे `जहॉं डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा’ हे वर्णन सार्थ करणारे साम्राज्य होते. अतिशय सुंदर, प्रशस्त रस्ते, भव्य देवळे, धर्मशाळा, किल्ले, प्रंचड मोठे हमामखाने, कालवे, हस्तीशाळा, घोड्यांचे तबेले, देखणा आणि मालाने तुडुंब भरलेला बाजार, कोरीव कामाचे स्तंभ यांनी नटविलेले हे साम्राज्य. हे दोघे भाऊही महापराक्रमी आणि अतिशय अभिमानी होते. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू येथल्या बाजारात मिळतात, अशी याची ख्याती होती. कस्तुरी, हिरे, मोती, माणके, सिल्क, जर, घोडे अशा अनेक वस्तूंची खरेदी विक्री येथे केली जात असे. त्यासाठी देशा-परदेशातले व्यापारी येथे येत असत. आता हे सारे शोधायचे हे भग्नावशेषातून. मात्र कल्पनाशक्ती चांगली असेल तर आजही कल्पनेतून हे वैभव सहज पाहता येते.
आता केवळ शिळा होऊन राहिलेल्या या ठिकाणी हिंडणे म्हणजे गतवैभवाच्या खुणा शोधत केलेला शांत प्रवास. बहुतेक महत्त्वाच्या इमारती दोन भागात आहेत. रॉयल सेंटर आणि धार्मिक सेंटर. भग्नावशेषही या वैभवाचा आरसा दाखविण्यास पुरेसे आहेत. कितीही वेळा येथे भेट दिली तरी दरवेळी कांहीतरी नवे गवसतेच. येथे असलेल्या प्रत्येक अवशेषाची एक कथा आहे. दगडातील रथ, विठ्ठल मंदिर, राजाचा महाल, राणीचा हमामखाना, कमल महाल, पुष्कर्णी, हजराराम मंदिर, विरूपाक्ष मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर, गणेश प्रतिमा यांचे दर्शन मनाला हळवे करणारे.
हंपीला निवासाची व्यवस्था नाही. जवळचे गांव होस्पेट. येथे मात्र निवासाची व्यवस्था आहे. हंपीला जाण्यासाठी वाहनेही मिळतात. गाईडच्या मदतीने हंपी पाहणे केव्हाही चांगले. येथील विठ्ठल मंदिरात म्युझिकल पिलर्स म्हणजे संगीताचे स्वर उमटणारे दगडी खांब आहेत.
बदामी
हंपीला गेले की जवळच असलेल्या बदामीच्या लेण्यांनाही जरूर भेट द्यावी.चार पुरातन गुहांमध्ये कोरलेली ही लेणी पाहण्यासारखी आहेत. बरीच चढ उतार करावी लागते. रस्ट रेड सँडस्टोनमधील या लेण्यांतील तिसरी लेणी सर्वात मोठी आहे. ही विष्णूला अर्पण केलेली लेणी असून येथे आहे १८ हजांचा नटराज. नृत्यांच्या विविध ८१ मुद्रा दाखविणारी शिल्पे. पहिल्या लेणीत अगस्त तीर्थ सरोवर व काठावर भूतनाथ मंदिर आहे. जवळच आहे बनशंकरी.
बनशंकरी
हे पार्वतीचेच रूप असून द्रविडी प्रकारात हे मंदिर आहे. अष्टभुजा, व्याघ्रेश्वरी स्वरूपातील ही देवी असून हिरदा नावाचा तलाव येथे आहे. बदामीला मुक्काम टाकूनच पडक्कल ही पाहावे. हेरिटेज साईट म्हणून मान्यता मिळालेल्या पडक्कल चालुक्य वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध. मलप्रभा नदीच्या काठावरचे हे ठिकाण चालुक्य राजांचे राज्याभिषेक होणारे स्थळ. वैशिष्ठपूर्ण रचना असलेली दहा मु‘य मंदिरे येथे आहेत. आठव्या शतकातले जंबुलिंग, कडासिद्धेश्वर व सर्वात मोठे असलेले विरूपाक्ष मंदिर अशिशय भव्य आहे. भव्य प्रवेशद्धार, शिलालेख, पुराणातील प्रसंग कोरलेले आहेत. राजा विक्रमादित्य व त्याला पल्लवांवर विजय मिळविण्यास मदत करणारी राणी लोकेश्वरी यांच्या कथा आजही सांगितल्या जातात. ७३५ एडी मध्ये हे युद्ध झाले होते असे इतिहास सांगतो.
हंपी चे विठ्ठल मंदिर
पंढरपूरला असलेली पांडुरंग अथवा विठ्ठलाची मुर्ती पुर्वी या मंदिरात होती व तेथून ती पंढरपूरला आणण्यात आली असा हि एक मत प्रवाह आहे . त्यामुळेच कदाचित आपण कानडा ग विठ्ठलू कर्नाटकु असे म्हणतो . विठ्ठल मंदिर हे 16 वे शतकातील आहे, जे भगवान विठ्ठल किंवा भगवान विष्णू यांना समर्पित आहे. त्याच्या सौंदर्य, क्लिष्ट कोरीव काम आणि भव्य आर्किटेक्चर पहाण्यासाठी येथे सर्व पर्यटक हंपी येतात तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनार्यावर वसलेले हे मंदिर मूळ दक्षिण भारतीय द्रविड मंदिर स्थापत्यशास्त्राची शैली दर्शविते.
विठ्ठल मंदिर राजा देवराया दुसरा याच्या कारकिर्दीच्या बांधले होते . पर्यटक अलंकृत खांब व मंदिराच्या दगडी शिल्पे पाहून प्रभावित होतात. विविध प्रकारच्या आवाज येणारे 56 वाद्य स्तंभ हे विठ्ठल मंदिराचे प्रमुख आर्कषण आहे.
या मंदिराचे एक दगडी रथ मुख्यतः प्रमुख आकर्षण आहे. रथ पर्णपणे दगडा पासून बनवला आहे त्यामुळे तो वजनदार आहे . परंतू त्याच्या दगडी चाकांमुळे तो एका ठिकाणावरुन दुसरी कडे घेऊन जाता येतो . मंदिर परिसरात अनेक मंदिरे आणि विशाल कक्ष आहेत .
कसे जाल .
हंपी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. बेल्लारी हे रस्ते मार्गाने देशातील प्रमुख शहरांस जोडले आहे . हंपी पासून जवळच असलेल्या हॉस्पीट शहरासाठी बंगलोर, हैदराबाद, गोवा इत्यादी आहेत शहरांतून बस सेवा ऊपलब्ध आहे .
हंपी सर्व प्रमुख शहरे आणि गावांमध्ये बस सेवांनी जोडलेली आहे.
हंपी जवळील स्थानिक विमानतळ बेल्लारी आहे. बेल्लारी विमानतळ 60 किमी च्या अंतरावर स्थित आहे
हंपीचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हॉस्पेट आहे जो 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
हंपी ची गुगल पीन
https://goo.gl/maps/MAKfnYdFARw
माहिती देणारे यु ट्युब व्हिडिओ
हंपी विठ्ठल मंदिर
https://youtu.be/aBjAWWrxQ6o
हंपी
https://youtu.be/BiBYU7MU0zI
https://youtu.be/3Ox3_4KmpU8
https://youtu.be/5XL349_dQns
https://youtu.be/d5AHQxIX7kE
https://youtu.be/HwcbVMGamd0
https://youtu.be/qyQ52Zw-tXY
बदामी
https://youtu.be/n6nHck7q3rg
बनशंकरी मंदिर
https://youtu.be/PpQ_MyeKMTo
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975

No comments:
Post a Comment