नवरात्र स्पेशल ५१ शक्तिपिठांची माहिती भाग १ ( १ ते ७ शक्तिपिठे )
१ ) अमरनाय महामाया शक्तीपिठ : गळा
भारतातील अत्यंत प्रसिद्ध अमरनाथ गुहेच्या येथे हे पिठ असून . जम्मु काश्मिर च्या अनंतनाग जिल्हाच्या पहेलगाम येथुन हे ठिकाण जवळ आहे . जुलैच्या नंतर सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यत जेव्हा अमरनाय यात्रा सुरु असते त्या वेळी भक्तगण या शक्तिपिठाचे दर्शन घेण्यास येतात . सतिच्या मानेचा भाग येथे पडला होता . येथे देवी महामाया या रूपात विराजमान आहे .
२ ) अट्टाहास फुल्लारी : खालचा ओठ
पश्चिम बंगालच्या बिरभुमी जिल्हयातील लाभपुर जवळील अट्टाहास या गावी सतीचा खालचा ओठ पडला होता . त्यामुळे या ठिकाणी मातेस भोग (नैवेद्य) दाखवला जातो व तो भोग प्रसाद म्हणून ग्रहण करणे फार भाग्याचे समजले जाते .
३ ) बहुला : डावा हात
पश्चिम बंगालच्या बर्धमान जिल्यातील कतवा येथुन ८ किलोमिटर वर असलेल्या केतु ग्रामाजवळील अजेय नदिच्या काठि पवित्र बहुला शक्तिपिठ वसले आहे . या ठिकाणी देवीचा डावा हात पडला होता . देवी सोबत येथे भिरूक भैरवाचे पण मंदिर आहे .
४ ) वक्रेश्वरी अथवा बंगाली उच्चार बक्रेश्र्वरी: दोन भुवयांमधिल भाग
पश्चिम बंगालच्या बिरभुम जिल्ह्यातील पापहरा नदिकिनारी सिऊरी शहरापासुन २४ कि . मी . वर दुब्राजपुर रेल्वे स्थानकापासुन ७ कि . मी . वर देवीचे पिठ आहे . येथे देवीच्या दोन्ही भुवयांमधिल भाग पडला होता . येथे महिषमर्दिनी स्वरूपात देवीचे पुजा केली जाते . देवळाच्या परीसरात ८ गरम पाण्याची कुंडे आहेत . येथे स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते .
५ ) अवंती / भैरवपर्वत : वरचा ओठ
मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन येथिल शिप्रा नदिच्या तिरावर भैरव पर्वतावर देवीचा वरचा ओठ पडला होता . येथे देवी अवंती रूपात वास करते .
६ ) भवानीपुर: डावा बाजुबंद
बांगलादेशातील शेरपुर गावाजवळ देवीचा डावा बाजुबंद पडला होता . येथे देवीची पुजा अपर्णादेवी या रुपात केली जाते . येथेच शिव वामन स्वरूपात विराजमान आहे .
७ ) गंडकी चंडि: कपाळ
नेपाळ मध्ये पोखरा पासून १२५ कि मी वर मुक्तिनाथ धवळगिरी पिठा जवळ गंडकी नदिच्या किनारी हे शक्तिपिठ आहे . येथे देवीचा कपाळाचा भाग पडला होता . येथे चक्रपाणिभैरवाचे मंदिर पण आहे . याचा उल्लेख विष्णुपुराणात आला आहे .
विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
Blogger and Travel agent
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
email address :-
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
Follow me on Twitter
No comments:
Post a Comment