शिर्डीचे साईबाबा
साईबाबा (इ.स. १८५६ – १५ ऑक्टोबर, १९१८) एक भारतीय फ़कीर होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली कारण त्यावेळी मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा लोक वापरीत असत, साई चा अर्थ 'फकीर' किंवा 'यवनी संत' असा आहे. साईबाबांसाठी हिंदू - मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” हे साईंचे बोल होते.
साईबाबांचे वास्तव्य व उत्तरकालीन मंदिर
साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबालोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाई नावाच्या पडक्या मशिदीत बसत होते व त्यानंतर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर, इ.स. १९१८ रोजी साईबाबांनी समाधी घेतली.
साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज हजारो भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.दिवसेंदिवस भाविकांची संख्येत वाढ होत आहे.
शिर्डीच्या मंदिर
आयुष्यभर फकिराचे जीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती बनले आहे़. साईबाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडित सुवर्ण मुकुटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात येतात.
कार्य
साईबाबांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यभर त्यांनी सबका मलिक एक हाच उपदेश केला. ते नेहमी अल्लाह मलिक असेही म्हणायचे.
भक्त समुदाय
साईबाबांचे भक्त भारतात आणि भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात आहेत. ठिकठिकाणी बाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्यांच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार ते अवतारी पुरुष होते. कुणी त्यांना दत्ताचा अवतार मानत तर कुणी विष्णूचा कुणी शिवाचा. बाबांच्या भक्त समुदायात सर्वच जातीधर्मांच्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम धर्मीय आहेत. मुस्लिम धर्मातही सुफी संतांमध्ये साई बाबांना मानाचे स्थान आहे.
साई बाबा आणि स्वामी स्वरूपानंद
जून २०१४ मध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असलेले जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी मात्र साई बाबांच्या पूजेला आपला विरोध दर्शवला. कारण त्यांच्या मतानुसार साई हे ईश्वर वा अवतार नसून एक सर्वसामान्य मनुष्य होते. त्यानंतर शिर्डी व काही ठिकाणी साई बाबांच्या भक्तांनी शंकराचार्यांच्या विरोधात निदर्शने केली.
साईबाबा हे मुस्लिम फकीर नसून ते जन्माने ब्राम्हण होते, त्यामुळे ते हिंदूच आहेत. असा दावा कांदिवलीच्या साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने सप्टेंबर २०१४ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावात २७ सप्टेंबर १८३७ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. साईबाबांच्या आईवडिलांनी बालपणी त्यांना मुस्लिम फकिराने केलेल्या आग्रहावरून त्यांच्या हवाली केले. पण नंतर त्या फकिराने साईबाबांना वेकुंशा नावाच्या हिंदू गुरूकडे सोपवले. साईबाबा यांचे खरे नाव हरिभाऊ आहे. याबाबत सबळ पुरावे असल्याचा दावाही साईधाम चॅरिटबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे .
साईबाबा संस्थान
साईबाबा संस्थान, शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिराचे कामकाज पाहणारे व साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविणारी संस्था आहे. या संस्थानाकडून इतरही अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. याची स्थापना दिनांक १३ फेब्रुवारी, इ.स. १९२२रोजी अहमदनगरच्या सिटी सिव्हील कोर्टाकडून झाली. शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज २०१५ साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या आहेत़.
शेवटच्या ९२ वर्षांतील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे़ १९२३ साली संस्थानच्या इंपीरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ १,४४५ रुपये ७ आणे व ६ पैसे होते़. आज २०१५ साली, पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे १,४८३ कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात आहेत़. या वर्षी ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी ९९ कोटी रुपये मिळाले़. संस्थानची स्थावर मालमत्ता पाचशे कोटींवर आहे़
याशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास ३८० किलो सोने, चार हजार किलो चांदी आणि सात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत़.
सभा
साईबाबा संस्थानची पहिली सभा दासगणू यांच्या अध्यक्षतेखाली संस्थानच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या रामनवमीला म्हणजेच दिनांक ६ एप्रिल, इ.स. १९२२ रोजी झाली होती.
प्रसादालय
५,५०० च्या आसन क्षमतेचे जेवणाचे हॉल, ज्यामुळे दररोज १०,००,००० भाविकांना खाणे शक्य होते.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी येथे येणाऱ्या या यात्रेकरूंना खाण्यासाठी दरवर्षी सरासरी १९० दशलक्ष रुपये खर्च करते.
मंगळवारी २४० दशलक्ष रुपये खर्चून बांधलेल्या याप्रसादालयाचे उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. हे संकुल ५.५ एकर जागेवर बांधले गेले असून १,००० चौरस फूट अंगभूत क्षेत्र आहे. हे मुख्य साई बाबा मंदिरापासून ७०० मीटर अंतरावर आहे.
तळ मजल्यावर एक विशाल हॉल तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये 3,,500०० भाविक बसू शकतात. पहिल्या मजल्यावरील प्रत्येकी १,००० बसण्याची क्षमता असणारी दोन स्वतंत्र हॉल बांधली गेली आहेत.
हॉलला पुरेसे नैसर्गिक प्रकाश देण्यासाठी पॉली कार्बोनेट आणि मंगलोरियन टाईल्सचे बनविलेले चौदा घुमट बांधले गेले आहेत, जेणेकरून दिवसाच्या सुर्य प्रकाश आत येईल .
संस्थानमध्ये दिले जाणारे जेवण अनुदान स्वरूपात अल्प दर आकारून दिले जाते . भाज्या ताजी ठेवण्यासाठी प्रचंड रेफ्रिजरेटिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. बहुतेक स्वयंपाक सौर ऊर्जेने केले जाईल. स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देऊन सर्व स्वयंपाक आधुनिक मशीनद्वारे केले जातील.
ट्रस्टच्या मते, आंध्र प्रदेशातील तिरुपतीनंतर शिर्डी हे भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या तीर्थस्थळांपैकी एक बनले आहे. सर्वसाधारण दिवशी सुमारे २०,००० भाविक शिरडीला भेट देतात तर उत्सवाच्या काळात ही संख्या जवळपास १०,००,००० पर्यंत वाढते.
पूर्वीच्या जेवणाच्या हॉलमध्ये एकत्रितपणे 1,000 लोकांची क्षमता होती.
प्रसाद मध्ये डाळ, तांदूळ, चपाती, दोन भाज्या आणि एक गोड असा साधा महाराष्ट्रीयन भोजन देण्यात येतो. ज्या यात्रेकरूंना पैसे देणे परवडत नाही त्यांच्यासाठी आणखी एक हॉल आहे, ज्यामध्ये 150 लोकांची क्षमता आहे आणि ट्रस्ट विनामूल्य भोजन देते.
प्रसादालय सकाळी १० ते रात्री १० या वेळेत खुले असते. प्रथम साईबाबांना भोजन दिले जाते आणि नंतर भाविकांना दिले जाते.
इतिहास
शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.
शिर्डीस जाण्याचा योग्य वेळ
वर्षातील कुठल्या हि दिवशी शिर्डीला जाता येते . परंतु महत्त्वाचे सण अथवा जोडून येणाऱ्या सुट्टयांचे दिवस टाळून जावे कारण या दिवसांत लाखो लोक दर्शनास येतात .
दर्शन व्यवस्था
शिर्डीस दोन प्रकारच्या दर्शन व्यवस्था आहेत . एक मुक्त दर्शन व दुसरे सशुल्क दर्शन . दोन्ही प्रकारच्या दर्शनास तेथिल काउंटर वर नोंदणी करणे गरजेचे असते . नोंदणी झाल्यावर आपणास एक पावती दिली जाते, ज्यात तुमचा फोटो ( जो काउंटरलाच काढतात ) , बारकोड व आपल्या दर्शनाची वेळ व कुठल्या प्रवेशदाराने आपणास दर्शनास जायचे त्याचा क्रमांक याची नोंद असते .
विशेष सुचना : आपणास दिलेल्या वेळेतच आपणास प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जातो . आपणास उशिर झाल्यास आपणास परत नव्याने वरिल सर्व प्रक्रिया करावी लागतं
निवास व्यवस्था
शिर्डी संस्थानचे स्वतःचे सुसज्ज भक्त निवास आहे . जे भाविक १ दिवसाच्या भेटिस येतात त्यांच्या स्नानासाठी संस्थान तर्फे अल्पदरात गरम पाणी व स्नानगृहाची व्यवस्था केली आहे . सोबत कॉल्करूम ची पण व्यवस्था आहे .
शिर्डीत प्रत्येकाच्या गरजे प्रमाणे सेवा देणारी अनेक खासगी लॉज व तारांकित हॉटेल आहेत .
शिर्डीस कसे जाल .
शिर्डी रस्तेमार्गाने देशातील मुख्य शहरांशी जोडले आहे . विविध शहरांतून शिर्डीस शासकिय अथवा खासगी बस ची चांगली व्यवस्था आहे .
शिर्डी येथे रेल्वे स्टेशन आहे . आपल्या शहरातून तेथे थेट रेल्वे सेवा आहे का याची चौकशी करावी . त्याचा स्टेशन कोड (SNSI) असा आहे . ज्यांच्या शहरांतून थेट सेवा नाहि त्यांच्यासाठी शिर्डी पासून १५ कि. मी . अंतरावरील दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील कोपरगाव स्टेशन सोईचे आहे . त्याचा स्टेशन कोड (KPG) असा आहे .
शिर्डी येथे स्वतःचे विमानतळ असून भारतातील काहि शहरांतून येथे नियमित विमान सेवा आहे . शिर्डी पासून जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे व मुंबई हे आहेत .
शिर्डीची गुगल पिन
Sai Baba Samadhi Mandir
Mauli Nagar, Shirdi, Maharashtra 423109
02423 258 500
Mauli Nagar, Shirdi, Maharashtra 423109
02423 258 500
https://maps.app.goo.gl/Ty7wkHiw96RhLaWA9
शिर्डीचे वर्णन करणारा युट्युब व्हिडिओ
https://youtu.be/XLyO5Hwaql8
साईबाबांच्या जिवनावरील चित्रपट
https://youtu.be/O_5NS4-K4aY
विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
WhatsApp number +918888741797
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975
संदर्भ :- विकीपिडिया , इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब
No comments:
Post a Comment