नवरात्र स्पेशल ५१ शक्तिपिठांची माहिती भाग २ ( ८ ते १४ शक्तिपिठे )
८ ) सप्तश्रृंगी अथवा भ्रामरी : हनुवटि
नाशिक जिल्हयातील सप्तश्रृंगी गडावर देवीचा वास आहे . सात डोंगरांचा समुह ग्हणून या गडास सप्तश्रृंग गड असे नाव पडले . गडावरील कपारीतील एका गुहेत देवीची स्वयंभू मुर्ती आहे . मुर्तीस १८ हात असून तीला १८ वार साडी नेसवावी लागते . येथे सतीचा हनुवटीचा भाग पडला होता . येथे तिची भ्रामरी म्हणून पुजा केली जाते . परंतु ती सप्तश्रृंगीदेवी म्हणून जनमानसात प्रसिद्ध आहे .
९ ) हिंगलामाता: डोक्याच्या कवटिचा भाग
पाकिस्थानातील कराची शहरापासून १२५ कि मी वर देवीचे ठाणे आहे . हे स्थान हिंदू व मुसलमान या दोघांसाठी पवित्र आहे . येथिल् एका टेकडींवर देवी विराजमान आहे . या ठिकाणी सतीचा कवटीचा भाग पडला होता . हे ठिकाण मुस्लिम लोकांसाठी पण पवित्र आहे . ते या देवीची पुजा नानी माँ म्हणून करतात . येथिल पुजारी हे हिंन्दू असून येथे बोललेला नवस पुर्ण होतो अशी दोन्ही धर्मियांची श्रद्धा आहे . बाबरी मज्जिद पाडल्यानंतर पाकिस्थानात जो हिंन्दू वर अत्याचार झाला मंदिरे पाडली गेली त्यावेळी या देवीच्या ठाण्याचे रक्षण स्थानिक मुस्लिम जनतेने केले .
१० ) जयंती ( नारटियांग दुर्गा ): डावी मांडी
मेघालय राज्यातील जयंतिया हिल्स जिल्हयात
नारटियांग गावाजवळ येथे सतीची डावी मांडी पडली होती . या शक्तिपीठास नारटियांग दुर्गा मंदिर या नावाने ओळखले जाते.
नारटियांग गावाजवळ येथे सतीची डावी मांडी पडली होती . या शक्तिपीठास नारटियांग दुर्गा मंदिर या नावाने ओळखले जाते.
११ ) योगेश्वरी : हाताचा पंजा व तळपाय
बांगलादेशातील शक्तिपीठचे ठिकाण . बांगलादेशात अनेक शक्ति पिठे आहेत . या ठिकाणी देवीच्या हाताचा पंजा व तळपाय पडला होता . शोरेश्वरी, ईश्वरीपूर, श्यामनगर, सातखिरा जिल्हा. ईश्वरीपूर राजधानी असलेल्या राजा प्रतापदित्याने या मंदिराचे बांधकाम केले.
१२ ) ज्वालाजी अथवा ज्वालामुखी : जिभ
हिमाचल प्रदेशातील कांग्रा खोऱ्यात ज्वालाजी चे ठाणे आहे . येथे सतीची जिभ पडली होती . या ठिकाणाचा शोध पांडवांनी केला . येथे कोणत्या हि प्रकारची मुर्ती नसून जमिनीखालून येणाऱ्या अखंड ज्योतीच्या स्वरूपात देवी भक्तांना दर्शन देते . हजारो वर्षापासून येथे हि ज्योत स्थापित असून भक्तांच्या मनोकामना देवी पुर्ण करत आहे . मंदिराच्या आत एकुण ९ ज्योती असून त्यांची नावे अनुक्रमे महाकाली, अन्नपूर्णा, चंडी, हिंगलाज , विंध्यावासनी , महालक्ष्मी, सरस्वती, अम्बिका, अंजीदेवी अशी आहेत . या मंदिराची प्राथमिक निर्मिती राजा भुमिचंद याने केले . त्यानंतर त्याचा जिर्णोद्धार राजा रंणजित सिंह व त्यानंतर त्याचं पुनर्निर्माण १८३५ मध्ये राजा संसारचंद याने केला . ज्वालामुखी मंदिराच्या जवळ बाबा गोरखनाथांचे मंदिर आहे . त्यास गोरख डिब्बी या नावाने ओळखले जाते .
१३ ) कोलकत्याची कालिका अथवा कालिघाटि मंदिर : उजव्या पायाची काही बोट
कालिताचे एक क्षेत्र काळी माता मंदिर आहे. या शक्तिपीठातील पुतळ्याची कामेदेव ब्रह्मचारी (पूर्वी त्यांना गंगोपाध्याय म्हणून ओळखले जायचे ) यांनी केली होती. शक्तिपीठ बनण्याचे मुख्य कारण असे की, तिच्या उजव्या पायाची काही बोटं या ठिकाणी पडली आहेत. आज काली येथील भक्तांसाठी हे मंदिर सर्वात मोठे मंदिर आहे. मातेच्या पुतळ्यामध्ये देवी कालीची एक सोन्याची पुतळा आहे जी काली मंदिरामध्ये बाहेरून आढळते. या पुतळ्यामध्ये देवी काली भगवान शिवच्या छातीवर पाय आहे. तिच्या मानेतील हार, तिच्या हातात कुत्र्या आणि काही मानवजाती आहेत, तिचा मान त्याच्या कमरबंदात बांधलेला आहे, तिची जीभ बाहेर आहे आणि तिच्या जीभ पासून रक्त काही थेंब देखील थरथरत आहेत. काही विद्वानांच्या मते काही विद्वान देखील या मूर्तीचे अनुसरण करतात. एकाच्या म्हणण्यानुसार, देवीला काहीतरी राग आला आणि त्यानंतर त्या हत्याकांडाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा राग शांत करण्याचा मार्ग भगवान शिव यांनी घेतला. त्याच वेळी देवीने तिचे पाय तिच्या छातीवर ठेवले आणि त्याच वेळी तिने भगवान शिव यांना ओळखले आणि मग नर शरीराला थांबविले.
१४ ) कालमाधव : डावा नितंब
मध्यप्रदेश तिल चित्रकुट पासूनच जवळ अमरकंठ येथे असलेल्या टेकडिवरिल गुहेत हे मंदिर आहे . हा सर्व परिसर शोण नदिच्या काठावर आहे . यास्थानि नर्मदा नदि ऊगम पावते . येथे सतीचा डावा नितंब पडला होता . येथे काली व शिव असितांग रूपात विराज मान असून , भक्तांना त्यांचे मनोवांछित फळ प्रदान करतात .
विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .
विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
Blogger and Travel agent
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
email address :-
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
Follow me on Twitter
फोटो : पुरातन कालिका मंदिर
No comments:
Post a Comment