Saturday, August 4, 2018

कॅलिफोर्नियाहुन सुंदर कोकण सहल

कॅलिफोर्नियाहुन सुंदर कोकण सहल (३रात्र / ४ दिवस)
सोमवार ते गुरवार .


सोमवार : -
सकाळी पुणे येथुन प्रमाण वाटेत शिवापूर येथे न्याहारी . साताऱ्याच्या आलिकडे  असलेल्या निंब ची बारा मोटेची विहिर पाहून कुंभार्ली घाट मार्गे चिपळुन कडे , दुपारचे जेवण चिपळुण येथे . त्यानंतर परशुराम मंदिर वाटेत वशिष्ठ नदिचा व्ह्यु पॉइंट पाहणे . तेथुन गुहागर कडे प्रयाण . गुहागर ला गेल्यावर थोडा वेळ विश्रांती घेवून सायंकाळचा चहा घेवून गुहागर बिच ला जाणे . तेथुन जागृत ऊफराटा गणपतीचं दर्शन घेवून व्याडेश्वर मंदिरात . तेथिल शंकरास अभिषेक * करुन जेवणाच्या ठिकाणी ( जेवणात खास ताज्या नारळाची सोलकढी). मुक्काम गुहागर .

* अभिषेक तेथिल नियम व अटि नुसार

मंगळवार:
सकाळी ८ वाजता न्याहारी न्याहारीस खास कोंकणी पद्धतीचे भाजणी थालिपिठ व चटणी ) करून  निघून बामनघळ पाहून हेदवी गणपतीच्या दर्शनास जाणे . तेथून पुढे वेळणेश्वराचे मंदिर व बिच . दुपारचे जेवण काकस्पर्श फेम नेने वाडा येथे . त्यानंतर गुहागरला थोडी विश्रांती .

दुपारी ३ वाजता गोपाळगड किल्ला कडे प्रयाण किल्ला व तेथिल लाईट हाऊस पहाणे . येथिल विशेष आकर्षण म्हणजे लाईट हाऊस च्या वर जावून खाडीचे विहंगम द्रुश्य पहाता येते . तेथून टाळकेश्वर मंदिर व तेथिल सी पॉइंट पाहुन गुहागर येथे . सायंकाळ विश्रांती साठी . त्यानंतर गुहागर येथिल दुर्गादेवी मंदिरात कोंकणातील खास देवीचा गोंधळ हा सांस्कृतिक कार्यक्रम पहाणे . तेथून सायंकाळच्या जेवणाच्या ठिकाणी ( खास मोदकांचा बेत ) मुक्काम गुहागर

हेदवी गणपतीस अभिषेक तेथिल नियम व अटि नुसार व ऊपलब्ध वेळे नुसार .

बुधवार:
सकाळी ८ वाजेपर्यत न्याहारी ( न्याहारी स घावन व चटणी ) करून गुहागर येथून प्रयाण . जेटितून समुद्राची खाडी ओलांडून जयगड ला जाणे वाटेत बाहेरून जयगड चे लाईट हाऊस पाहून गणपतीपुळे चे दर्शन . दुपारचे जेवण गणपतीपुळे येथे .

त्यानंतर भगवती किल्ला , काळापांढरा समुद्र , पतित पावन मंदिर व थिबा पॅलेस पाहुन पावस स्थलदर्शन करून गुहागरला .

सांयंकाळ चे जेवण गुहागरला ( स्पेशल मेन्यु डाळींबीची ऊसळ व खमंग काकडी ) मुक्काम गुहागर

गुरवार:
सकाळी ८ वाजता न्याहारी (न्याहारी स खास कोंकणचे मिरगुंड व पोहे) करून धोपवे बंदर मार्गे जेटिने दाभोळ येथे तेथिल गुहेतील चंडिका मंदिरास भेट तेथिल च जवळच्या कोळेश्वराचे दर्शन घेवून तामसतिर्थ येथिल एकमुखी दत्त व बुरोंडि येथिल परशूराम पुतळा पाहून दापोली येथे दुपारच जेवण . जेवणानंतर ताम्हीणी मार्गे पुणे कडे प्रयाण . पुणे पोहच .

सहल दिनांक
जेष्ठ नागरिक स्पे . २७ ऑगस्ट २०१८
महिला स्पे . ३ सप्टेंबर २०१८

प्रवासाचे वाहन:- १७/३५ सिटर बस .

पिकअप / ड्रॉप पॉइंट
पिकअप
१ ) निगडी बस स्टॉप सकाळी . ६ : ०० मि .
२ ) चापेकर चौक सकाळी ६ : १५ मि .
३ ) ब्रेम्हन चौक औध सकाळी ७ : ०० मि .
४ ) पौड फाटा : सकाळी ७ : ३० मि .
+ +पिककप पॉइंट ला १५ मि . अगोदर येणे .


१ )डॉर्मेट्री रूम २० व्यक्तीं ( ४ टॉयलेट/ बाथरूम अॅटॅच्ड) सहल खर्च ६५००/ - प्रती व्यक्ती .

२ )स्पेशल रूम ४ व्यक्तीं साठी (सामाईक) सहल खर्च ९५००  / -  रू . प्रती व्यक्ती .

३ )स्पेशल रूम फक्त २ व्यक्तीं साठी सहल खर्च १३ , ५०० / -रू .  प्रती व्यक्ती .

४ व्यक्ती च्या ग्रुप ला प्रती व्यक्ती ५०० / - रू डिस्काउंट .

अधिक माहितीसाठी संपर्क : -

शैलेश चौधरी
( ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
९७६७५ ९१६७५

पर्यटण एक चळवळ

पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग

https://www.blogger.com/blogger.g?blogID=844112665234788640#allposts

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Travelbirdindia

आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
https://mobile.twitter.com/Shailesh1881975














No comments:

Post a Comment